नागपूर खंडपीठामध्येसुद्धा लढले होते राम जेठमलानी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

नागपूर : देशातील प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांच्या निधनाने विधी क्षेत्राला अत्यंत दुख: झाले आहे. राम जेठमलानी यांनी देशातील अनेक बहुचर्चित खटले हाताळले आहेत. 1980 च्या दशकामध्ये अमरावतीमधील बहुचर्चित महल्ले बंधू हत्याकांडातील आरोपींची बाजूसुद्धा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये मांडली होती.

4-5 सप्टेंबर 1978 च्या रात्री नरेंद्र आणि रमेश महल्ले या दोन भावांची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणामध्ये पाच जणांना आरोपी म्हणून म्हणून उभे केले होते. दोनही भावांचा राजकीय क्षेत्रामध्ये मोठा दबदबा होता. त्यावेळी, शेगाव ग्रामपंचायतीमध्ये आपला उमेदवार सरपंच पदावर बसविण्यासंदर्भात दोन गटांमध्ये वाद होता. या प्रकरणात आरोपीची बाजू मांडण्याकरिता राम जेठमलानी स्वत: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आले होते. सत्र न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपींचे अपील फेटाळत उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती. त्यावेळी, वरिष्ठ वकील वी. आर. मनोहर, वी. आर. डागा आणि ऍड. राम जेठमलानी या त्रिकुटांनी हा खटला लढला होता. शहरातील धंतोलीमधील रहिवासी ऍड. वी. आर. डागा यांच्या घरी त्यांचे येणे-जाणे सुरू होते. ऍड. वी. आर. डागा यांचे चिरंजीव ऍड. राजेंद्र डागा हे राम जेठमलांनी यांच्या आठवणी सांगताना म्हणाले की, जेठमलानी एक कर्मठ, समर्पित आणि झुंजार वकील होते. तळातून सुरू केलेला त्यांचा संघर्ष वकिलांसाठी खूप प्रेरणादायी आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur bench Ram Jethmalani was fighting