नागपूरच्या दाम्पत्याने वर्ध्यात केली आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide case

नागपूरच्या दाम्पत्याने वर्ध्यात केली आत्महत्या

आष्टी : चारचाकी वाहनाने भ्रमंती करून व्यवसाय करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील पारडी येथील वयोवृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. या दोघांचे मृतदेह तालुक्यातील पांढुर्णा प्रवासी निवारा परिसरात आढळून आले. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास उघड झाली. रामकृष्ण खडतकर (वय ६०) व शोभा रामकृष्ण खळतकर (वय ४३) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे मृतदेह आढळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला आहे. यावेळी दाम्पत्याजवळ विषारी द्रव्याचे दोन ग्लास व बॉटल, पिशवी आदी साहित्य मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. सदर घटनेची माहिती आष्टी पोलिसांनी मृताच्या परिवाराला दिली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळून आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वयोवृद्ध दाम्पत्याच्या आत्महत्येने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

पारडी (नागपूर) येथील रहिवासी रामकृष्ण खडतकर व त्यांच्या पत्नी शोभा हे होघे २७ जुलैपासून घरून त्यांचे व्यवसायाचे वाहन घेऊन निघाले होते. याप्रकरणी त्यांच्या मुलाने नागपूर ग्रामीण पारडी पोलिस ठाण्यात दोघे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. या काळात ते त्यांच्या एमएच ४९ एटी ५७९६ क्रमांकाच्या वाहनाने भ्रमंती करीत होते. अशातच दुपारी दीड वाजताच्या दरम्यान आष्टी तालुक्यातील पांढुर्णा प्रवासी निवारा परिसरात या दोघांचे मृतदेह आढळले.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये तोटा येऊन घर विक्री करावे लागले. यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, उपनिरीक्षक अनिल देव, उपनिरीक्षक अनिल देरकर, शेख नबी, गजानन वडनेरकर, बालाजी सांगळे, अश्विनी वानखडे यांनी पंचनामा केला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस करीत आहेत.

Web Title: Nagpur Couple Committed Suicide In Wardha Pandhurna Bus Stand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurWardhaBus Stand