
नागपूर : हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हुडकेश्वर (खुर्द) मधील आनंदनगर परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यूची घटना गुरुवारी (ता.६) समोर आली. याप्रकरणी तिच्यावर अत्याचार करून खून झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून प्राप्त झाली आहे. त्यातून अत्याचार आणि खूनाचा गुन्हा हुडकेश्वर पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला आहे.