

Vidarbha Cold
sakal
नागपूर : जम्मू-काश्मीरसह पहाडी भागांमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी नागपूरचा पारा दीड अंशाने घसरून १४.४ वर आला असून, विदर्भातील नीचांकी तापमानाची नोंद गोंदियात झाली. सध्या थंडीसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.