नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Nagpur Graduate Election Result : रात्री नऊ वाजेपर्यंत ही स्थिती कायम असल्याने मतमोजणी केंद्रावरील काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे.
Nagpur Graduate Election Result

Nagpur Graduate Election Result

esakal

Updated on: 

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीदरम्यान निकालाचे चित्र बदलत गेले. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी घेतलेली आघाडी कमी करत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजीत वंजारी यांनी जोरदार मुसंडी मारली. रात्री नऊ वाजेपर्यंत ही स्थिती कायम असल्याने मतमोजणी केंद्रावरील काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com