Nagpur High Courtsakal
विदर्भ
Flyover: उड्डाणपुलाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण न केल्यास अवमानना कारवाई; अमरावती मधील अपूर्ण कामावरून उच्च न्यायालयाचा अल्टिमेटम
Nagpur High Court: अमरावतीतील सात वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. कामात उशीर झाल्यास अवमानना कारवाई होईल, अशी कठोर तंबीही न्यायालयाने दिली.
नागपूर : अमरावती येथील चित्रा टॉकीज जवळील उड्डाणपुलाचे अपूर्ण काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिले.