

Nagpur Highway Accident Deaths Fall by 26 Percent in Two Months Saving 128 Lives Through Stronger Road Safety Measures
esakal
नागपूर: नागपूर महामार्ग परिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या डेटा-आधारित संयुक्त कारवाईचा सकारात्मक परिणाम समोर आला असून, जून-जुलै २०२६ या दोन महिन्यांत महामार्गावरील अपघाती मृत्यूंमध्ये तब्बल २६ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या ४४२ मृत्यूंची संख्या यंदा ३२९ वर आली असून, त्यामुळे १२८ नागरिकांचे प्राण वाचले आहेत.