Nagpur crime news
esakal
नागपूर : प्रेमसंबंधातून १६ वर्षीय मुलगी गर्भवती झाल्याने तिच्या गर्भपात करण्यासाठी चक्क यू-ट्यूब पाहून वनऔषधी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी १८ र्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. यश राजेश गुटके (वय १८) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.