हॉल बंद, हाल सुरू!

नितीन नायगावकर
बुधवार, 13 जून 2018

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत देशपांडे सभागृहाचा विरह सोसणाऱ्या नागपूरच्या सांस्कृतिक विश्‍वाला यंदा पावसाळी अधिवेशनाचाही फटका बसला आहे. अधिवेशनाच्या पंधरा दिवस आधीपासून मेन्टनन्ससाठी सभागृह बंद करून सर्व बुकिंग रद्द झाल्यामुळे आता दुसरे सभागृह मिळविण्यासाठी आयोजकांची धडपड सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सालाबादाप्रमाणे हिवाळी अधिवेशनही नागपुरात होणार असल्याने यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे.

यंदा पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा प्रयत्न असल्यामुळे बरेच दिवस चर्चा रंगल्या. पण, अनिश्‍चिततेचे वातावरण कायम होते. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या कालावधीतील सभागृहाचे बुकिंग सुरू ठेवले. त्यामुळे आयोजकांनाही चिंता नव्हती. अनेकांनी गाण्यांच्या मैफली, नाट्यप्रयोग, कॉर्पोरेट कॉन्फरन्स आदी कार्यक्रमांसाठी अख्खा जून महिना सभागृहाचे बुकिंग झालेले होते. १५ जूनपूर्वीच्या कार्यक्रमांना अडचण नसली तरी १५ ते ३०  जून या कालावधीत जवळपास ३५ कार्यक्रमांसाठी सभागृहाचे ऑनलाइन बुकिंग झालेले होते. हे सर्व बुकिंग रद्द करण्यात आल्याने आयोजकांचा गोंधळ उडाला आहे. एकीकडे देशपांडे सभागृहाएवढी क्षमता असलेले दुसरे सभागृह नागपुरात नाही. सुरेश भट सभागृहासह त्याचे भाडेही भव्य आहे. त्यामुळे अनेकांना कार्यक्रम रद्द करावे लागले आणि काहींना ते छोट्या सभागृहांमध्ये शिफ्ट करावे लागले. येत्या १६ जूनला ‘देखणी बायको दुसऱ्याची’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग देशपांडे सभागृहात होणार होता. तर २४ जूनला आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली होती. यासह इव्हेंट समन्वयक शशांक गडकरी यांनी सहा कार्यक्रमांसाठी सभागृहाचे बुकिंग केले होते. तेही रद्द करण्यात आले. सभागृह १५ जूनपासून बंद राहणार असल्याचे प्रशासनाने जूनच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस वर्तमानपत्रातील जाहिरातीद्वारे जाहीर केले. त्यानंतर संबंधित आयोजकांना याची माहिती देण्यात आली.

नाटकाच्या प्रयोगासाठी एक महिन्यापूर्वी आणि गाण्यांच्या मैफलीसाठी तीन महिन्यांपूर्वी सभागृहाचे बुकिंग केले होते. ऑनलाइन तिकीट विक्रीदेखील झाली. मात्र ऐनवेळी बुकिंग रद्द झाल्याने श्रोत्यांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम होतो.

- समीर पंडित,  सििद्धविनायक पब्लिसिटी

Web Title: nagpur news Deshpande hall close