दोन विमाने विलंबाने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

नागपूर - डीजीसीएच्या नोटीसनंतर इंडिगो आणि गोएअरने मंगळवारी देशभरातील सुमारे ६५ उड्डाणे रद्द केली. यामुळे देशभरातील प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. नागपुरात मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही.

नागपूर - डीजीसीएच्या नोटीसनंतर इंडिगो आणि गोएअरने मंगळवारी देशभरातील सुमारे ६५ उड्डाणे रद्द केली. यामुळे देशभरातील प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. नागपुरात मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही.

अहमदाबाद येथून लखनौला जाण्यासाठी उड्डाण भरणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने काही मिनिटांतच हे विमान अहमदाबादेतच उतरावे लागले. या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवाई वाहतूक नियंत्रक डीजीसीएने इंडिगोला नोटीस बजावून ए-३२० नियो विमाने चालविण्यावर प्रतिबंध आणले. गोएयरलाही अशाच प्रकारची नोटीस बजावण्यात आली. यामुळे इंडिगोच्या ४७ उड्डाणांसह दोन्ही कंपन्यांनी सुमारे ६५ उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. इंडिगोच्या संकेतस्थळावर मंगळवारचे नागपूर-दिल्ली विमान रद्द करण्याचा उल्लेख आहे. परंतु, हे विमान रद्द झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. विमानतळावरील सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ दोन विमाने नागपुरात दाखल होण्यास विलंब झाला. 

इंडिगोचे कोलकाता येथून येणारे विमान दुपारी ३ ऐवजी दोन तास विलंबाने म्हणजेच सायंकाळी ५ वाजता नागपूर विमानतळावर उतरले. याचप्रमाणे गोएयरचे रात्री ८.२० वाजता मुंबईहून येणारे विमान रात्री  ९.३० वाजता उतरले.

Web Title: nagpur news flight indigo