पित्याच्या किडनीदानातून मुलाला जीवनदान  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

नागपूर-  हातमजुरी करणाऱ्या पित्याने आपल्या तरुण लेकराला जीवन-मृत्यूच्या यातना सहन करताना पाहिले. डायलिसीसवर असलेल्या ३२ वर्षीय मुलाला किडनी दान करीत त्यांनी जीवनदान दिले. बुधवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २५ वे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले.  

नागपूर-  हातमजुरी करणाऱ्या पित्याने आपल्या तरुण लेकराला जीवन-मृत्यूच्या यातना सहन करताना पाहिले. डायलिसीसवर असलेल्या ३२ वर्षीय मुलाला किडनी दान करीत त्यांनी जीवनदान दिले. बुधवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २५ वे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले.  

किडनीग्रस्तांसाठी सुपर स्पेशालिटी वरदान ठरत आहे. येथे वर्षभरात किडनी प्रत्यारोपणाच्या २५ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. कमलेश गुप्ता याच्या दोन्ही किडन्या आजारपणामुळे निकामी झाल्या. वडील श्‍यामलाल गुप्ता यांच्या दानातून सुपरच्या किडनी प्रत्यारोपण टीमने आपली २५ वी प्रत्यारोपणाची शल्यक्रिया यशस्वी केली. कमलेशला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. अस्वस्थ असलेल्या कमलेशला कुटुंबीयांनी सुपर स्पेशालिटीत आणले. मे महिन्यात चाचणी केल्यानंतर त्याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. कमलेशचा श्‍वास डायलिसीसवर होता. दरमहा डायलिसीस करण्यासाठी सुपर स्पेशालिटीत यावे लागत असे. वडील श्‍यामलाल यांनी किडनी दान करण्याची तयार दर्शविली. पंधरा दिवसांपूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. बुधवारी शल्यक्रिया पार पडली. 

सुपर पथक  
सुपर स्पेशालिटीत अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मधुकर परचंड यांच्या मार्गदर्शनात किडनी प्रत्यारोपण झाले. किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. चारुलता बावनकुळे, युरोलॉजिस्ट डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. समीर चौबे, डॉ. विशाल रामटेके, भूलतज्ज्ञ डॉ. विजय श्रोते यांच्या पथकाने प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. सुपरच्या किडनी प्रत्यारोपण प्रकल्पात पॅथॉलॉजी आणि बायोकेम विभाग महत्त्वाचा आहे. रक्ताच्या व इतर चाचण्या सामान्य आल्याशिवाय किडनी प्रत्यारोपण शक्‍य नसते. अशा वेळी डॉ. संजय पराते, डॉ. संजय सोनुने आणि डॉ. भूषण महाजन यांचे पथक पडद्यामागची मोठी भूमिका वठवितात, हे विशेष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news Kidney donation Child life

टॅग्स