बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

धामना लिंगा, (जि. नागपूर)- नागपूर-अमरावती मार्गावरील वेणा जलाशयाजवळच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ रविवारी दहा युवक नाव उलटून पाण्यात बुडाल्याची घटना सायंकाळी घडली. बुडाल्यांपैकी नावाडी अतुल ज्ञानेश्‍वर बावने (वय २२, रा. पेठ) एकमेव बचावला असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले असून, सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

नागपूर-अमरावती महामार्गावरील गोंडखैरीनजीक वेणा जलाशय आहे. येथे सुटीच्या दिवशी आसपासचे नागरिक पर्यटनासाठी येत असतात. आज रविवारी चौदा मैल येथील सिटीलाईन रुग्णालयाचे तीन कर्मचारी व काही मित्र असे एकूण दहा जण सुटी असल्यामुळे येथे आले. हे सर्व वेणा जलाशयाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे जात असताना वजन जास्त झाल्याने नाव एका बाजूने झुकून कलंडली. यात सर्व दहा जण जलाशयात बुडाले. नावाडी अतुल ज्ञानेश्‍वर बावने (वय २२) पोहणे येत असल्याने बचावला. कळमेश्‍वर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत सहा जणांचे मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले होते. दोघांचे मृतदेह चौदा मैल सिटीलाइन हॉस्पिटल आठवा मैल येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

शोधमोहिमेत आठवा मैल येथील सिटीलाइन रुग्णालयाचे कर्मचारी अमोल मुरलीधर दोडके (वय २८, रा. दत्तात्रयनगर, नागपूर), अंकित अरुण भोसेकर (वय २२, रा. हिंगणा) यांच्यासह अक्षय मोहन खांदारे (वय २२, पेठ काळडोंगरी), राहुल जाधव (नवीन सुभेदारनगर, नागपूर), रोशन ज्ञानेश्‍वर खंदारे (वय २३, पेठ काळडोंगरी) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. रात्री उशिरा आणखी एक मृतदेह शोधण्यात यश आले. परेश काटोके, अतुल भोयर (हुडकेश्‍वर), पंकज डोईफोडे (उदयनगर, नागपूर), प्रतीक आमडे (उदयनगर, नागपूर) यांचा शोध सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news Ten youth drowned vena lake