वायुसेनेने काळासोबत सिद्ध केली क्षमता

निखिल भुते
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

नागपूर - काळाच्या ओघात कुठेही मागे न पडता अत्याधुनिक अशी विमाने आणि इतर साहित्याच्या साहाय्याने भारतीय वायुसेनेने सदैव स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे. भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या तीन मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची आणि भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.

भारतीय वायुसेनेची स्थापना ८ ऑक्‍टोबर १९३२ मध्ये झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. वायुदलाचे नाव १२ मार्च १९४५ रोजी रॉयल इंडियन एअर फोर्स झाले. काळाच्या ओघात हवाई दलाने आधुनिकेतची कास धरत विकास केला. १९४७ मध्ये विमानांना पिस्टनवर चालणारी इंजिने बसवलेली असत. जेट इंजिनांच्या आगमनानंतर त्याची जागा वेगवान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी केली गेली. यानंतर तंत्रज्ञानाच्या कसोटीवर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. भारतीय परराष्ट्र धोरणामुळे आणि रशियाने उत्तम सहकार्य केल्याने दणकट बनावटीची रशियन बनावटीची लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी करण्यात आली. तसेच रशियन हेलिकॉप्टर्स सहभागी करण्यात आली.

सद्य:काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंटिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणक प्रणाली वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत.

भारतीय वायुसेना नेहमीच कर्तव्यावर खरी उतरली आहे. सेनेच्या या यशामागे शिस्त, कठोर परिश्रम, उत्तम प्रशिक्षण आणि आत्मविश्‍वास कारणीभूत आहे. 
- विंग कमांडर समीर गंगाखेडकर जनसंपर्क अधिकारी, रक्षा मंत्रालय, नागपूर

Web Title: nagpur vidarbha news The ability of the Air proved with time