घरोघरी पोहोचावी आरोग्याची गंगा

गोविंद हटवार
बुधवार, 21 जून 2017

भारतीय योग विद्याधामचा संकल्प - नागपुरातील शाखेची रौप्यमहोत्सवी वाटचाल

नागपूर - आरोग्यम्‌ धनसंपदा (२००९), मन करा रे प्रसन्न (२०१३), आरोग्य गंगा घरोघरी (२०१६) असे उपक्रम राबवून भारतीय योग विद्याधामच्या नागपुरातील शाखेने नागरिकांच्या मनात घर केले. या शाखेची सध्या रौप्यमहोत्सवी (२५ वर्षे) वाटचाल सुरू आहे. योगदिनामित्त या शाखेच्या कार्याचा घेतलेला आढावा.

भारतीय योग विद्याधामचा संकल्प - नागपुरातील शाखेची रौप्यमहोत्सवी वाटचाल

नागपूर - आरोग्यम्‌ धनसंपदा (२००९), मन करा रे प्रसन्न (२०१३), आरोग्य गंगा घरोघरी (२०१६) असे उपक्रम राबवून भारतीय योग विद्याधामच्या नागपुरातील शाखेने नागरिकांच्या मनात घर केले. या शाखेची सध्या रौप्यमहोत्सवी (२५ वर्षे) वाटचाल सुरू आहे. योगदिनामित्त या शाखेच्या कार्याचा घेतलेला आढावा.

भारतीय योग विद्याधामची मुख्य शाखा नाशिकमध्ये आहे. संस्थापक डॉ. विश्‍वासराव मंडलिक आहेत. देशात सुमारे १७५ ठिकाणी शाखा आहेत. विदर्भात नागपूर, चंद्रपूर, कोराडी आणि वरोरा येथे शाखा आहेत. गुरू-शिष्य परंपरेनुसार योग शिकविला जातो. मनोहर चारमोडे नागपुरातील शाखाप्रमुख आहेत. ‘योग पथिक’ या व्हॉट्‌सॲप ग्रुपने हा परिवार आता जोडला गेला आहे. दर महिन्याच्या एक तारखेला योग प्रवेशाचा वर्ग घेतला जातो. महिन्याच्या शेवटी परीक्षा घेतली जाते. त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. 

चंद्रशेखर गाडगीळ, सुनीता गाडगीळ, मधुकर देशमुख, राजा देशमुख, निशा देशमुख, स्मिता चारमोडे, प्रदीप पोळ, प्रसाद पिंपळे, सुजाता बन्सोड, रूपाली वांदे, वासुदेव परिपठार, विनोद मुटकुरे हे विद्याधामचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.  

दीड हजार जणांचा ‘योग प्रवेश’
नागपुरात आतापर्यंत सुमारे १५० योग प्रवेशाचे वर्ग झाले. एका वर्गात सरासरी १५ जण प्रशिक्षण घेतात. एक हजार ५०० जणांनी याचा लाभ घेतला. योगदिनाला किंवा विशेष शिबिरातही योगाचे धडे दिले जातात. योग परिचयाचे सुमारे १५ वर्ग झाले. त्यातून ४५० जणांना योगाचा परिचय झाला.  
सोप्याकडून कठीणकडे
अष्टांग योगाला डोळ्यांसमोर ठेवून अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. योगामध्ये जवळपास १० ते १५ महत्त्वाची आसनं आहेत. सोप्याकडून कठीणकडे या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. ओंकारनगरातील ग्रीन प्लॅनेट पार्कमध्ये सकाळी सहा ते सव्वासातदरम्यान योगा केला जातो. वयाची १२ वर्षे पूर्ण केलेला व्यक्ती योगा करू शकतो. प्रकृती बरी असल्यास ६०-६५ वर्षांचा व्यक्तीसुद्धा योगा करू शकतो. 

योग अभ्यासक्रम
१) योग प्रवेश, २) योग परिचय, ३) योग शिक्षक, ४) योगप्रबोध, 
५) योग प्रवीण, ६) योग अध्यापक, ७) योग पंडित, ८) योग प्राध्यापक  

योगाने केले डॉक्‍टरांना बरे
बालाजीनगरातील डॉ. सोनुने या बालरोगतज्ज्ञ. पण, त्यांना वयाच्या तेविसाव्या वर्षापासून रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. पाठीचा मणकाही दुखायचा. वयाच्या पस्तिशीनंतर त्यांनी योगाची साथ धरली. योगा संजीवन केल्यास पाठीच्या मणक्‍याचा त्रास कमी होतो. सुमारे सहा महिने योगा केल्याने त्यांचा रक्तदाबाचा त्रासही कमी झाला. त्यानंतर त्या नियमित योगा करू लागल्या. त्यामुळे त्यांचा आजार पळाला. 

रुग्ण झाल्या योगशिक्षिका
भारती कटियार यांना वयाच्या २७ व्या वर्षी मधुमेह झाला. शरीरातील साखरेचे प्रमाण ३२० ते ३५० पर्यंत गेले. लठ्ठपणा वाढू लागला. त्यामुळे त्यांनी दुसरे बाळही होऊ दिले नाही. शरीर बेडौल दिसू लागले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा योगाकडे वळविला. सहा महिन्यांनंतर १२०-१३० पर्यंत शरीरात साखरेचे प्रमाण झाले. वजन आटोक्‍यात आले. नियमित योगासनांमुळे सर्व आजार दूर पळाले. स्वतः शिकता-शिकता त्या आता योगा शिकवू लागल्या.

२००६ पासून योग विद्याधामशी जुळलो. योगाचे प्रशिक्षण चांगल्या संस्थेतून घ्यावे. शास्त्रशुद्ध माहिती घ्यावी. नियमित योगा केल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. 
- लक्ष्मीकांत महादेवराव वांदे, कार्यवाह, भारतीय योग विद्याधाम, नागपूर शाखा.

Web Title: nagpur vidarbha news global yoga day