esakal | गडचिरोली ब्रेकिंग : जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार, चार जवान जखमी?
sakal

बोलून बातमी शोधा

naxal

संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर ठप्प आहे. अशात माओवादी देखील शांत असतील असा जाणकारांचा अंदाज होता, मात्र त्यांच्या घडामोडी सुरूच असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येते.

गडचिरोली ब्रेकिंग : जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार, चार जवान जखमी?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गडचिरोली : भामरागड तालुक्यात माओवादी व पोलिसांत चकमक उडाल्याची माहिती हाती आली आहे. आज (ता. १७) सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलल्या जात असून अद्याप पोलिस प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. या चकमकीत चार पोलिस जवान जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर ठप्प आहे. अशात माओवादी देखील शांत असतील असा जाणकारांचा अंदाज होता, मात्र त्यांच्या घडामोडी सुरूच असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येते.

भामरागड तालुक्यातील कोपरशी गावालगतच्या जंगल परिसरात सकाळी सहा वाजताच्या सुमारास नक्षल व पोलिसात चकमक झाल्याची माहिती आहे. या चकमकीत चार जवान जखमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोठी मदत केंद्रातर्गत येत असलेल्या कोपरशी जंगल परिसरात सकाळी पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. प्रतिऊत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. मात्र या चकमकीबाबत पोलिस विभागाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.