esakal | विदर्भातील कोरोनाची परिस्थिती सुधारतेय, बाधितांच्या संख्येत झाली घट...
sakal

बोलून बातमी शोधा

corona negative

यवतमाळचे तिन्ही रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डातील तिन्ही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका नर्सचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.

विदर्भातील कोरोनाची परिस्थिती सुधारतेय, बाधितांच्या संख्येत झाली घट...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : जगाला आपल्या विळख्यात घेतलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला आहे. यामुळे भारतीय नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रत्येक जण आपल्या व देशाच्या आरोग्यासाठी घरीच थांबला आहे. अशातच विदर्भातून एक समाधानाची बातमी आली आहे. नागपूरचे चार व यवतमाळच्या तीन अशा एकूण सातपैकी सहा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे येत्या काळात विदर्भ कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडेल, यात शंका नाही.

कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. मात्र कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. 11 ते 24 मार्च या कालावाधीत चार जणांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी तिघांची प्रकृती ठणठणीत आहे. तिघेही दुसऱ्या चाचणीत कोरोना निगेटिव्ह आले आहेत. यामुळे त्यांना कोरोना मुक्त घोषित करण्यात आले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना 14 दिवस डॉक्‍टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. उर्वरित एका बाधिताची प्रकृती तशी स्थिर आहे.

मंगळवारी (ता. 24) रोजी नागपुरात मेडिकल आणि मेयोत दाखल झालेल्या कोरोना संशयितांची संख्या 14 आहे. तर मेयो येथील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 9 जण निगेटिव्ह आले आहेत. 

जनता कर्फ्यूतही गडचिरोलीच्या या माणसाने जपली माणुसकी

यवतमाळचे तिन्ही रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डातील तिन्ही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका नर्सचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.

जिल्ह्यात विविध ठिकाणी नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. होम क्वारंटाईनच्या परिघाबाहेर आलेले नागरिक पुढील दहा दिवस ते आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली राहणार असून त्यांनी स्वत:च काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच आरोग्य विभागाने केले आहे.