esakal | कोरोना आणखी पसरतोय, महिनाभरानंतर दोन आकड्यांवर रुग्णसंख्या
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना आणखी पसरतोय, महिनाभरानंतर दोन आकड्यांवर रुग्णसंख्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार झाल्याचे चित्र असतानाच शहरात मात्र मागील आठ दिवसांपासून कोरोना हळूहळू हात पाय पसरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. रविवारी (ता. ५) रोजी नागपूर शहरात दुहेरी आकड्यात असलेल्या १० बाधितांची नोंद (nagpur corona update) झाली आहे. यामुळे महापालिका (nagpur municipal corporation) प्रशासनाच्या चिंतेतही पुन्हा एकदा भर पडली आहे. दिवसभरात अवघ्या पाच जणांनी कोरोनावर मात केली आहे. नागपुरात डेल्टा प्लसचे (nagpur delta plus cases) ५ रुग्ण महिनाभरापूर्वी आढळून आल्यामुळे रुग्णांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जात असून महापालिका प्रशासनाकडून २६० नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा: कोरोना आला आणि भारतात शिक्षक ‘दीन’ झाला

नागपूर जिल्ह्यात ५ ऑगस्ट २०२१ रोजी १२ बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाची संख्या दोन वर आली होती. मात्र, महिनाभरानंतर ५ सप्टेंबरला ४ हजार ४०२ चाचण्या झाल्या. १० जण बाधित आढळले. ग्रामीणमधून सलग तिसऱ्या दिवशी एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ९३ हजार ६० झाली आहे. तर कोरोनामुक्तांची संख्या ४ लाख ८२ हजार ८९४ झाली आहे. बाधितांचा आकडा फुगताच सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरात ४२ व ग्रामीणमध्ये ५ असे ४७ सक्रिय कोरोनाबाधित आहेत.

२० दिवसांची प्रतीक्षा -

डेल्टा प्लस रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांवरही विशेष काळजी घेतली जात आहे. सध्या, सर्व नवीन संक्रमित लोकांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. जिनोमची चाचणी नीरीच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेत केली जाते. नीरीमध्ये जिनोम केल्यानंतर, अंतिम अहवालासाठी सेंटर फॉर सेल्युलर आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, हैदराबादला पाठविला जात आहेत. येथे चार ते पाच दिवसात अहवाल येतात. मात्र पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे नवीन स्ट्रेन तपासण्यासाठी नमुने पाठवले गेल्यानंतर अहवालासाठी २० दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.

loading image
go to top