

Corruption Exposed: Worker’s Father Asked for Bribe, Accused Arrested
sakal
लाखनी (जि. भंडारा): नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्तीची रक्कम मिळवून देण्यासाठी ११ हजारांची लाच स्वीकारताना सेतू केंद्र चालकाला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (ता. १०) भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथे केली. सतीश तुळशीराम मोटघरे (संचालक, नेहा सेतू केंद्र, सिंधी लाइन चौक, लाखनी) असे आरोपीचे नाव आहे.