
नागपूर : महालमधील हिंसाचारानंतर आतापर्यंत ११७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ९६ आरोपींना अटक करण्यात आली असून १२ जणांची पोलिसांनी कोठडी मिळविली आहे. दरम्यान रविवारी पोलिसांकडून संपूर्ण संचारबंदी उठविण्यात आली. मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त कायम आहे.