पेट्रोल पंपावर होणारी लूट नियंत्रणात येण्याची शक्यता; वाचा कारण

पेट्रोल पंपावर होणारी लूट नियंत्रणात येण्याची शक्यता; वाचा कारण

नागपूर : पेट्रोल पंपावर (booty at the petrol pump) दिलेल्या पैशा एवढे पेट्रोल न मिळाल्यास ग्राहकांना संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार करता येणार (Complaints can be made) आहे, असे भारत पेट्रोलियमने स्पष्ट केले आहे. शहरातील हरिहर पांडे यांनी पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र (Letter to the Minister of Petroleum) लिहिले होते. याच्या उत्तरात भारत पेट्रोलियमने प्रधानमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात खुलासा केला आहे. (Now-the-booty-at-petrol-pump-is-likely-to-come-under-control)

यासंदर्भात दै. ‘सकाळ’ने ५ जून रोजी ‘पेट्रोल पंपावर सक्षम पारदर्शक यंत्रणा लावा’ असे वृत्त प्रकाशित केले होते.  सरकारने पांडे यांच्या पत्राची गंभीर दखल घेत अधिक खुलासा करण्यासाठी पेट्रोल कंपन्यांकडे पाठविले होते. त्यावर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे (बीपीसीएल) मुख्य व्यवस्थापक (किरकोळ व्यापार) हेमंत राठोड यांनी पत्राद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.  पारदर्शकते संदर्भातील मुद्द्याकडे बीपीसीएलने स्पष्ट केले आहे की, मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करणारा डीलर कारवाईस पात्र राहील. या आदेशामुळे पेट्रोल पंपावर होणारी लूट नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

पेट्रोल पंपावर होणारी लूट नियंत्रणात येण्याची शक्यता; वाचा कारण
पत्नी उच्चशिक्षित असेल तरीही पोटगी द्या : उच्च न्यायालय

पेट्रोलचे दर शंभरीच्या पलीकडे तर डिजेलही उंबरठ्यावर आहे. त्यातही दिलेल्या पैशाच्या मोबदल्याएवढे इंधन मिळत नाही. हे टाळण्यासाठी पारदर्शक यंत्रणा अस्तित्वात असायला हवी, असे पत्र हरिहर पांडे यांनी २ जून रोजी पेट्रोलियम मंत्रालयाला लिहिले होते. या पत्रामुळे सर्वसामान्य ग्राहकांना न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

पेट्रोल पंपावर होणारी लूट नियंत्रणात येण्याची शक्यता; वाचा कारण
विदर्भ ते थेट लंडन, शेतकरी पुत्राची ६३ हजार विद्यार्थ्यांमधून निवड

बीपीसीएलचे स्पष्टीकरण

तेल सेवा विपणन कंपन्या ग्राहकांच्या सेवांची उपलब्धता आणि प्रमाण सुनिश्चित करण्यासाठी मानके बनवतात. विपणन शिस्त मार्गदर्शक सूचनांनुसार गैरवर्तनाच्या प्रस्थापित प्रकरणांसाठी डीलरवर कारवाई केली जाते. रिटेल आउटलेट डीलर्सना वितरक युनिटद्वारे उत्पादनाच्या योग्य वितरणाबद्दल ग्राहकांना समाधानी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर ग्राहकांना कोणत्याही किरकोळ विक्रेत्याचा वाईट अनुभव आल्यास त्याची सूचना आम्हाला द्या, आमच्याकडे तक्रार करा, असे बीपीसीएलने पत्रात स्पष्ट केले आहे.

(Now-the-booty-at-petrol-pump-is-likely-to-come-under-control)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com