
केळवद : नागपूर– बैत्तुल राष्ट्रीय महामार्गावरील छत्रापूर शिवारात शुक्रवारी सकाळी सुमारे अकरा वाजता भरधाव ट्रेलरने जनावरांच्या कळपाला जबर धडक दिल्याने १२ जनावरांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जनावरे गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.