esakal | पुण्यातून परतल्यानंतर १२ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह, नागपूर पोलिसांत खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

corona

पुण्यातून परतल्यानंतर १२ पोलिसांना कोरोना, नागपूर पोलिसांत खळबळ

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : पुणे येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ३० ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत एक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यात नागपुरातील ३३ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. त्यापैकी तब्बल १२ पोलिस पॉझिटिव्ह (nagpur police corona positive) आढळून आले आहेत. त्यामुळे नागपूर पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

हेही वाचा: सांगली: पंचेचाळीस वर्षावरील २५ टक्के लोकांना हवी आहे कोरोना लस

पुण्यात झालेल्या शिबिराला राज्यातील अनेक जिल्ह्यांतून पोलिस सहभागी झाले होते. ९ सप्टेंबरला प्रशिक्षण संपल्यानंतर पोलिस कर्मचारी आपआपल्या कर्तव्याच्या ठिकाणी परतले. नागपुरात आल्यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याला ताप आला. त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली. त्यांच्यासोबत प्रशिक्षणासाठी गेलेल्या आणखी २० कर्मचाऱ्यांची चाचणी केली असता त्यापैकी १० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच उर्वरीत १३ लोकांची कोरोना चाचणी केली असता आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला. सर्वांवर महापालिकेच्या मदतीने उपचार सुरू आहे. शिबिराला गेलेले अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलिस दल आणि महापालिका प्रशासनाची चिंता वाढळी आहे.

अनेकांचे लसीकरण पूर्ण -

फ्रंट लाईन वर्कर म्हणून पोलिसांचे लसीकरण खूप आधीच पूर्ण झाले होते. यापैकी एका कर्मचाऱ्याला फक्त कुठलातरी आजार असल्यामुळे त्यांनी लशीचे डोस घेतले नव्हते. उर्वरीत सर्वांचे लशीचे डोस पूर्ण झाल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिबिरामध्ये नागपूरसह अनेक जिल्ह्यातील पोलिस सहभागी झाल्यामुळे आता कोरोनाचा स्फोट होणार का? अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top