संत्रानगरी धास्तावली : जिल्ह्यात गुणाकार पद्धतीने वाढताहेत बाधित, एकाच दिवशी 13 मृत्यू

 9 deaths in a single day due to corona; 305 interrupted
9 deaths in a single day due to corona; 305 interrupted

नागपूर :  कोरोना विषाणूच्या प्रकोपाने आता संत्रानगरी धास्तावली आहे. दोन दिवसांचा कर्फ्यू जनतेने उत्स्फूर्तपणे पाळला. मात्र त्यानंतरही कोरोना संक्रमणासह मृत्यूची साखळी तोडण्यात यश आले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असून, आतापर्यंतच्या पाच महिन्यात बाधितांचा उच्चांक गाठला आहे. एकाच दिवशी 13 मृत्यू तर 305 कोरोनाबाधितांची नोंद झाली. कोरोनाचा विळखा विस्तारत असल्याने प्रशासन पुरते हादरले आहे. विशेष असे की, घातक कोरोनाने दोन दिवसांच्या बाळाच्या आईचाही जीव घेतला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात गुणाकार पद्धतीने बाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी एकाच दिवशी 305 जणांना बाधा झाल्याने 4 हजार 972 वर आकडा पोहचला. मृतकांची संख्या 109 वर पोहचली आहे. यासोबतच एकाच दिवशी 379 जणांनी कोरोनावर मात केल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. नागपूरच्या मेयो आणि मेडिकलमध्ये दगावलेल्या 9 बाधितांमध्ये केवळ 2 जण बाहेरचे आहेत. उर्वरित 7 मृत्यू शहरातील असल्यामुळे ही बाब प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरली आहे. मेयो रुग्णालयात 6 जण दगावले असून यातील 5 महिला आहेत. तर एक पुरुष आहे. 

गांधीबाग येथील 58 वर्षीय व्यक्तीला अवघ्या एक दिवसापुर्वी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांना हृदयविकारासह श्‍वसनाचा आजार होता. त्यात कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. जाफरनगर येथील 75 वर्षीय महिलेस 23 जुलैरोजी श्‍वसनाचा त्रास वाढल्याने त्यांना मेयोत दाखल केले. दरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाली. वय अधिक असल्याने त्यांच्या श्‍वसन यंत्रणेवरही गंभीर परिणाम झाले. बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. उत्तर नागपुरातील नारीरोड कामगार नगर येथील 68 वर्षीय महिला कोरोनाच्या बाधेने दगावली. कोरोनाच्या बाधेने त्यांचे फुफ्फुस निकामी झाले. श्‍वास घेणे कठिण झाले. व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. अखेर त्यांचा मृत्यू झाला. पंचशीलनगर येथील 50 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कळमना भरतनगर येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

16 जुलै रोजी या महिलेस मेयोत दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सातत्याने त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होते. मधुमेह, उच्च रक्तदाब असे विविध आजार असताना त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने जोखमी वाढली. डॉक्‍टरांनी प्रयत्न केले, परंतु अखेर 29 जुलैरोजी त्या मेयोत दगावल्या. मेडिकलमध्ये बुधवारी 3 जण दगावले आहेत. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना 22 जुलैरोजी मेडिकलमध्ये रेफर केले. मात्र त्यांची स्थिती गंभीर होती. उच्च रक्तदाब होता. किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे त्यांना जोखीम मोठी होती. यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. यशोधरानगर येथील 59 वर्षीय व्यक्तीच्या कोरोनाच्या बाधेचा अहवाल 29 जुलैरोजी दुपारी सकारात्मक असल्याचे कळले. पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. रामबाग येथील 50 वर्षीय व्यक्तीला 28 रोजी मेडिकलमध्ये दाखल केले. अहवाल कोरोनाबाधित आल्यानंतर बुधवारी ते दगावले. 

प्रसूत मातेचा कोरोनामुळे मृत्यू 


मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्‍यातील अवघ्या 20 वर्षीय गर्भवती मातेला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. अतिशय गंभीर अवस्थेत मेयोत दाखल करण्यात आले. कोरोनाची बाधा झाल्यानंतर डॉक्‍टरांनी जीवावर उदार होऊन प्रसूती केली. मात्र रक्तदाब वाढला, त्यातच हिमोग्लोबीन कमी होते. डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु मातेला वाचवू शकले नाही. मात्र दोन दिवसांचे बाळ मात्र सुखरुप आहे. 

एकाच दिवशी 379 कोरोनामुक्त 


एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मेडिकल, मेयो आणि एम्ससह कोविड केअर सेंटरमधून एकाच दिवशी 379 जणांनी कोरोनावर मात केली. पाच महिन्यांच्या कालावधीत काच दिवशी 379 जणांना कोरोनामुक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 हजार 69 झाली आहे. यात शहरातील 1 हजार 693 तर ग्रामीण भागातील 1 हजार 376 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्या 1616 कोरोनाबाधितांवर नागपूर शहरात उपचार सुरू आहेत. मेयोत 378, मेडिकलमध्ये 297 तर एम्समध्ये 40 उर्वरित कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. 

आजचे मेयोतील मृत्यू 

  • मुलताई यथील 20 वर्षीय प्रसूत मातेचा मृत्यू 
  • गांधीबागेतील 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
  • जाफरनगर येथील 75 वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • नारीरोड येथील 68 वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • पंचशीलनगर येथील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू 

मेडिकलमधील मृत्यू 

  • अमरावती येथील 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
  • यशोधनानगर येथील 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
  • रामबाग येथील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com