
भिवापूर : आठव्या वर्गात शिक्षण घेणारी अवघी १३ वर्षांची विद्यार्थिनी सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक केली आहे.