Nagpur : घरात एक दोन नव्हे तर आढळली कोब्राची १४ पिल्ले, हिंगण्यात खळबळ!

Cobra Snake : पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी साप निघत आहेत. पण, नागपुरातील हिंगणा रोड येथील अमरनगर परिसरातील एका घरात एक दोन नव्हे तर १४ कोब्राची पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
14 cobra baby were found in nagpur dilip yadav house
14 cobra baby were found in nagpur dilip yadav houseSakal

Nagpur News : पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी साप निघत आहेत. पण, नागपुरातील हिंगणा रोड येथील अमरनगर परिसरातील एका घरात एक दोन नव्हे तर १४ कोब्राची पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील दिलीप यादव यांच्या घरी हा प्रकार घडला. ही कोब्राची १४ पिल्ले पकडण्यात सर्प मित्राला यश आले.

घरात साप असल्याचे कळताच यादव यांनी सर्पमित्र आकाश मेश्राम, विकास मेश्राम आणि आदित्य बाळबुदे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आले. यादरम्यान शोध मोहिमेत कोब्राची १४ पिल्ले पकडण्यात सर्पमित्रांना यश आले.

14 cobra baby were found in nagpur dilip yadav house
Nagpur Crime : आले चौकीदार म्हणताच पित्याने मुलावर झाडली गोळी

पिल्यांची संख्या जास्त असू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार घर मालकाला लक्ष ठेवण्याविषयी सांगण्यात आले आहे. सर्पमित्रांनी सर्व पिल्ले जंगल परिसरात सोडून दिली. रात्रीची वेळ असल्याने विषारी कोब्राला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. परंतु सर्पमित्र तात्काळ आल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com