Nagpur News : जिल्ह्यात अकरा दिवसात १४ मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur latest Marathi News, Nagpur News

नागपूर जिल्ह्यात अकरा दिवसात १४ मृत्यू

नागपूर - जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरात वाहून गेल्याने व वीज पडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.(Nagpur latest Marathi News)

विजांचा कळकळाट होत आहे. वीज पडून ११ जणांचा मृत्यू झाला. तर दोन महिला वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडल्या. एक व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले. वीज पडून मृत्यू पडलेल्यापैकी १० जणांना आर्थिक मदत देण्यात आली. एक व्यक्ती मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. भिंत पडलेल्या व्यक्तीच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्रलंबित असल्याने मदत देता आली नाही.

५३ जनावर मृत

अतिवृष्टी व वीज पडून ५३ जनावरे मृत्यू मुखी पडलेत. तर तीन जखमी झाले. मृत जनावरांकरिता मालकांना मदत देण्यासाठी शासनाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पावसामुळे १८ गोठ्यांचे नुकसान झाले. तर १२० घर घरांचे अंशतः नुकसान झाले.

१४०० हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १४०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. तर ५८ हेक्टर जागा खरडून गेल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

Web Title: 14 Deaths In Eleven Days Due To Rains In Nagpur District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurMonsoon
go to top