Mon, Sept 25, 2023

कोरोनाबाधितांची उसळी
Published on : 13 July 2022, 3:35 am
नागपूर - दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये दोन दिवसांपासून घट दिसत असताना मंगळवारी अचानक (ता. १२) बाधितांच्या संख्येने उसळी घेतली. शहरात शंभर तर ग्रामीण भागात ४६ असे एकूण १४६ कोरोनाबाधित आढळले. जिल्ह्यात तिसरी लाट ओसरल्यानंतर नवीन विक्रम प्रस्थापित करणारी आजची संख्या आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र मेडिकलमध्ये ८ कोरोनाबाधित दाखल असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
तर शहरातून ८२ आणि ग्रामीणमधून १० अशा ९२ जणांनी आज कोरोनावर मात केली. दिवसभरात जिल्ह्यात १हजार८८६ चाचण्या झाल्या. यात ७.७५ टक्के म्हणजेच १४६ जण बाधित आढळेल. कोरोनामुक्तांच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढत असल्याने सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा चांगलाच फुगत आहे. आता शहरात ५९२ आणि ग्रामीणमध्ये २६६ असे जिल्ह्यात ८६३ सक्रिय कोरोनाबाधित जिल्ह्यात आहेत.