Nagpur News : विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय ऋत्विकचा मृत्यू; महाल परिसरात हळहळ
Electric Shock : नागपूरच्या महाल परिसरात १६ वर्षीय ऋत्विक दारोडकर याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्याने घरातील लोखंडी दांडा हाताळल्यावर ही घटना घडली.
नागपूर : कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत महाल येथील जामदार शाळेजवळ राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.२२) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.