
नागपूर : कोरोना विषाणूमुळे (coronavirus) निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या बातम्या येत आहेत. अशातच एक दिलासा देणारी बातमी आली आहे. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत (butibori midc) इंडोरामा, होरिबा, गोयल प्रोटिन्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या चार कंपन्या १६०० कोटींची गुंतवणूक करणार आहेत. यात अंदाजे तीन हजार लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. विदर्भातील औद्योगिक क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे. (1600 crore investment in butibori midc of nagpur)
इंडोरामा कंपनीच्या मंडळाच्या झालेल्या बैठकीत अतिरिक्त गुंतवणूक करण्यावर शिक्कामोर्तब केले. कंपनीचे व्यवस्थापन बदलल्यानंतरची विदर्भातील या कंपनीची पहिली गुंतवणूक आहे. कंपनी येथे टिकाऊ पॉलिस्टर मल्टीफिलामेंट यार्न तयार करणार आहे. याचे उत्पादन २०२२ च्या दुसऱ्या तिमाहिमध्ये करण्याचे उदीष्ट्य आहे. बुटीबोरीत जपानी कंपनी होरिबा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ५०० कोटीची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पात रक्तातील पेशी तपासण्यासाठीचे सेल काऊंटर मशीन व त्यासाठी लागणाऱ्या रसायनाचे उत्पादन केले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे उभा झाला असून लवकरच उत्पादन सुरू होणार आहे. यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एक हजार जणांना रोजगार मिळणार आहे. होरिबा इंडियाचा हा भारतातील सर्वात मोठ प्रकल्प आहे.
विस्तारित बुटीबोरीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गोयल प्रोटिन्स आणि इंडियन ऑईल या तीन कंपनीनी जागा घेतली आहे. इंडियन ऑईल ही कंपनी सुरू झाली आहे. गोयल प्रोटिन्सने ४० एकर जागा घेतली आहे. त्यात ३५० कोटीच्या गुंतवणूकीसह ७०० लोकांना रोजगार देणार आहे. त्यात सोयाबीन तेलाचे उत्पादन होणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी १५० कोटींची गुंतवणूक करणार असून २०० एकर जागाही घेतली आहे. पुढील दोन वर्षात प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे.
आकडे बोलतात -
कंपनीचे नाव जागा गुंतवणूक (कोटीमध्ये) रोजगार
होरिबा इंडिया - १५ एकर ५०० १०००
गोयल प्रोटिन्स - ४० एकर ३५० ७००
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड - २०० एकर १५० - ५००
इंडोरामा - विस्तार ६०० ५००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.