esakal | नाना पटोले फडणवीसांच्या मतदारसंघावर करणार दावा?
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole

नाना पटोले फडणवीसांच्या मतदारसंघावर करणार दावा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नितीन गडकरी (union minister nitin gadkari) यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (former cm devendra fadnavis) यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याचे समजते. पटोले यांनी या संदर्भात काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत खासगीत चर्चा केली. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहे. (maharashtra congress president nana patole will claim on devendra fadnavis constituency in nagpur)

हेही वाचा: ...तर जीवहानी होऊ शकली असती; सरकारने धोरण ठरवण्याची वेळ

नाना पटोले शनिवारी नागपूरला आले होते. त्यांनी पहिली बैठक दक्षिण-पश्चिमच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतली. महापालिका निवडणूक हा बैठकीचा मुख्य अजेंडा होता. आत्तापासून चांगल्या कार्यकर्त्यांची पेरणी करून आपली मांड अधिक घट्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

भाजपचे खासदार असताना नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर तोफ डागली होती. त्यानंतर खासदारकीचा राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यांना काँग्रेसने थेट गडकरी यांच्या विरोधात नागपूरमधून लढण्यास सांगितले होते. गडकरी एकतर्फी विजयी होतील असे सर्वांना त्यावेळी वाटत होते. मात्र, त्यांनी पाच लाखांचे मताधिक्य घेण्याचे भाजपचे दावे फोल ठरविले होते. दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीत फडणवीस यांना काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी चांगलेच झुंजविले. फडणवीस यांच्या समर्थकांनी एक लाखांच्या मताधिक्यांनी ते निवडून येतील असा दावा केला होता. प्रत्यक्षात त्यांना पन्नास हजाराचेसुद्धा मताधिक्य घेता आले नाही. थोडी मेहनत, पद्धतशीर नियोजन आणि काँग्रेसला एकजूट ठेवले तर कोणालाही मात देता येऊ शकते असा विश्वास मात्र यामुळे काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे. राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसींमध्ये निर्माण झालेली नाराजी, महागाईच्या विक्रमाने मोदी सरकार विरोधातील असंतोष कॅश करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्यावतीने केला जात आहे.

चर्चेला अर्थ नाही -

विधानसभेच्या निवडणुकीला तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. पटोले तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष राहतीलच याची कोणालाच खात्री देता येत नाही. काँग्रेसमध्ये निवडणूक जाहीर झाल्यावर उमेदवार ठरविले जातात. त्यामुळे नाना पटोले यांच्याविषयी चर्चेला काही अर्थ नाही. विजयाची खात्री असलेला आपला मतदारसंघ ते सोडून नागपूरला येतील असे वाटत नसल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

loading image
go to top