
नागपुरात १७ पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; पोलिस आयुक्तांची कारवाई
मागील काही दिवसांपासून राज्यातील पोलिस दलांसदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, नागपूरचं पोलिस दलाचीही कायम चर्चा असते. कायदा सुवस्थेचे तीनतेरा उडाल्याच्या नकारात्मक बातमीमुळे तर कधी पोलिसांच्या बदलीबाबत उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे नागपुर संदर्भात नेहमी बोलंल जाते. सध्या नागपूरच्या पोलिस दलाची एक वेगळी बातमी समोर येत आहे. येथील पोलिस दलातील तब्बल 17 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे.
हेही वाचा: ''हिंदुत्त्व हा शब्द तुम्ही पुजा पद्धतीशी जोडू नका''
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी 17 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. आजारी असल्याच्या कारणाने किंवा इतर कुठल्याही कारणाने गेल्या सहा महिन्यापेक्षा जास्त काळ सुट्टीवर असलेल्या आणि वारंवार सूचना देऊनही कर्तव्यावर रुजू न झालेल्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कोणतेही ठोस कारण न देता वारंवार कामावर गैरहजर राहणाऱ्या तब्बल 17 पोलिसांना नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. आरोग्य आणि अन्य रजा घेऊन सतत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांची यादी तयार करण्यात आली होती. यात अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
दरम्यान, वारंवार गैरहजर राहणाऱ्या या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर काही कर्मचारी हजर झाले मात्र जे हजर झाले नाहीत ते ठोस कारण देऊ शकले नसल्यानं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वारंवार गैरहजर राहणाऱ्या सतरा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून काही कर्मचारी निलंबनाच्या मार्गावर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकाच वेळी 17 पोलीस कर्मचारी निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा: 'राजकीय विषयावर बोलून आज कुणाचाही मूड खराब करायचा नाहीये'
Web Title: 17 Police Personnel Suspended By Absent On Duty Action Taken From Cp Amitesh Kumar In Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..