
नागपूर : एम्समध्ये उपचार घेत असलेल्या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी आक्रोश करीत उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. मुलाला साप चावला असताना उंदीर चावल्याचा उपचार करण्यात आला. स्ट्रेचरवर सलाईन लावून सोडून देण्यात आले, इंग्जेक्सनही लावले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.