
पारशिवनी : तालुक्यातील तामसवाडी येथील सिमेंट रस्त्याच्या कामादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास मिक्सर ट्रकने झोपेत असलेल्या १९ वर्षीय मजुराला चिरडले. त्यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. अनुज लक्ष्मीचंद यादव (रा. मांडवा, तह. जुन्नारदेव, जि. छिंदवाडा, म.प्र.) असे मृत तरुणाचे नाव आहे.