क्लिनिकल ट्रायल अंतर्गत लहान मुलांना मिळाला लसीचा पहिला डोज

क्लिनिकल ट्रायल अंतर्गत लहान मुलांना मिळाला लसीचा पहिला डोज
Pix_Pratik

नागपूर : संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोनानं (Corona virus) आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. मात्र आता काही कंपन्यांनी या महामारीवर लस (Corona vaccine) शोधून काढली आहे. भारतात आधी ६० वर्षांवरील व्यक्तींना त्यानंतर ४५-६० वयातील आणि नंतर १८ (18+ vaccination) वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरु आहे. मात्र लहान मुलांसाठी (Vaccine for children) लस कधी येणार हा प्रश्न पालकांनी उपस्थित केला होता. आता हैदराबादच्या भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीनं २ ते १८ या वयोगटातील लहान मुलांसाठी कोरोना लसीची निर्मिती केली आहे. याचं क्लिनिकल ट्रायल (Clinical Trial of Vaccine) सध्या नागपुरातील मेडेट्रिना रुग्णालयात केली जात आहे. (1st dose of clinical trail of corona vaccine to children in Nagpur)

क्लिनिकल ट्रायल अंतर्गत लहान मुलांना मिळाला लसीचा पहिला डोज
बापरे! 'या' वर्षापर्यंत पृथ्वीवरील पाण्याचा साठा पूर्णपणे होणार नष्ट

आजपासून सुरू करण्यात आलेल्या या क्लिनिकल ट्रायलमध्ये लहान मुलांना लसीचा पहिला डोज देण्यात आला आहे. यासाठी रुग्णालयाकडून लहान मुलांचे वयोगटानुसार ग्रुप करण्यात आले आहेत. यात २ ते ६ वर्षांचा एक ग्रुप, ६ ते १२ वर्षांच्या एक ग्रुप आणि १२ ते १८ वर्ष वयोगटातील आहे. यातील १२ ते १८ वर्ष वयोगटातील लहान मुलांवर लसीच्या पहिल्या डोजची चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांची RTPCR चाचणी करण्यात आली आहे आणि त्यांना कोणताही आजार नाही हे लक्षात घेऊनच त्यांची निवड करण्यात आली आहे.

लसीच्या चाचणीसाठी १०० मुलांनी नोंदणी केली होती, मात्र सर्व चाचण्यांनंतर यातील ५० मुलांना ट्रायलसाठी निवडण्यात आलं. यातीळ काही मुलांना पहिला डोज देण्यात आला आहे तर दुसरा डोज २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे.

या कालावधीत या मुलांवर डॉक्टरांची टीम लक्ष ठेऊन असणार आहे. त्यांना काही त्रास होतोय का? ऍलर्जीं होतेय का? यासंबंधी निरीक्षण केलं जाणार आहे. त्यानंतर त्यांचे ब्लड सॅम्पल्स घेऊन त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासल्या जाणार आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

क्लिनिकल ट्रायल अंतर्गत लहान मुलांना मिळाला लसीचा पहिला डोज
अखेर 'तो' चिमुकला ठरला अंधश्रद्धेचा बळी; पोटावर चटके देण्यात आलेल्या मुलाचा मृत्यू

१८ वर्षांवरील व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांनाही ०.५ मिलिलिटर लस देण्यात येत आहे. त्यामुळे आता जर हे क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली तर पालकांची आणि सर्व लहान मुलांची चिंता मिटणार आहे हे नक्की.

(1st dose of clinical trail of corona vaccine to children in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com