Nagpur Crime : नागपूर विमानतळावर दोन तस्करांना पकडले; ३८ लाख रुपयांच्या २०० ग्रॅम सोन्याचे बार जप्त

मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव हे दोघे एअर अरेबिया विमानाने शारजाहून नागपूर येथील विमानतळावर उतरले.
2 smugglers nabbed at nagpur airport 200 gram gold bars worth Rs 38 lakh seized
2 smugglers nabbed at nagpur airport 200 gram gold bars worth Rs 38 lakh seizedSakal

Nagpur News : सीमा शुल्क विभागाच्या एअर कस्टम्स युनिट (एसीयू) आणि एअर इंटेलिजेंस युनिटच्या (एआययू) पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी पहाटे सोन्याची तस्करी करणाऱ्या मुंबई येथील मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३८ लाख रुपयांच्या २०० ग्रॅम सोन्याचे बार व इतर वस्तू जप्त केल्या.

मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव हे दोघे एअर अरेबिया विमानाने शारजाहून नागपूर येथील विमानतळावर उतरले. ते सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार दोघेही विमानतळावर उतरताच त्यांना ताब्यात घेत तपासणी केली.

दरम्यान, दोघांकडून प्रत्येकी १०० ग्रॅम सोन्याचे बार सापडले. तसेच २० नग आय फोन १५ प्रो मॅक्स जप्त केले आहे. त्याची किमत १८ लाख १६ हजार ९३० रुपये आहे. तर आठ लॅपटॉपही आढळले. त्याचे मूल्य दोन लाख ५९ हजार रुपये आहे.

तर एक आयपॅड एअर जप्त केले. त्याची किंमत ४१ हजार आहे. १४ हजार ४०० नग विदेशी सिगारेट स्टिक्स मिळाले असून त्याची किंमत जप्त केले. १ लाख ९८ हजार रुपये त्याची किंमत आहे. या मुद्देमालाची किंमत ३७ लाख ८१ हजार आहे. या दोघांना सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून त्यांचा तपास करण्यात येत आहे. ही कारवाई

एआययूचे सहाय्यक आयुक्त अंजुम तडवी आणि एसीयूचे सहाय्यक आयुक्त व्ही. लक्ष्मीनारायण, सहाय्यक आयुक्त अलेक्झांडर लाक्रा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत सीमा शुल्क अधीक्षक मनीष पंढरपूरकर, राजेश खापरे, प्रकाश कापसे, सीमा शुल्क निरीक्षक विशाल भोपटे, शुभम कोरी, योगिता मुलाणी, आदित्य बैरवा, कृष्णकांत ढाकर आणि प्रियांका मीना पुढील तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com