गुमगाव - गुमगाव नजीकच्या समृद्धी गोल पॉइंटवर बुधवारी दुपारी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मयूर महादेव कुबडे (२०, रा.गुमगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या अपघातामुळे संतापलेल्या गुमगाव परिसरातील नागरिकांनी समृद्धी महामार्गावर गुरुवारी सायंकाळी रास्ता रोको आंदोलन केले. गतिरोधक बसविणे तसेच इतरही मागण्यांसाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे गुमगावजवळील समृद्धी गोल पॉइंट परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
गुमगाव येथे राहणारा मयूर कुबडे हा हिंगणा येथील कॉलेजमधून परीक्षा देऊन घरी परत येताना समृद्धी गोल पॉइंटवर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. गंभीर जखमी मयूरला रुग्णालयात नेले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी मयुरच्या पार्थिवावर गुमगाव येथील वेणा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यानंतर गुमगाव, कोतेवाडा, वागदरा, वडगावगुजर, धानोली, कान्होली, शिवमडका, किरमिटी, खडका, सुमठाणा, सालईदाभा गावांतील संतप्त नागरिकांनी समृद्धी गोल पॉइंट चौकात आंदोलन केले. यानंतर आंदोलकांनी हिंगण्याचे तहसीलदार सचिन कुमावत आणि ठाणेदार जितेंद्र बोबडे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज आष्टणकर, कोतेवाड्याचे माजी सरपंच रवींद्र आष्टणकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रेमनाथ लोणारे,लीलाधर तुराळे,स्वप्नील रागीटे, भागवत आष्टणकर, वागधराचे माजी उपसरपंच किशोर पडवे, जितू वैद्य, सुदर्शन गुप्ता,संतोष वानखेडे, विजय घटे,शैलेश लोणारे आदी सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.