voter registration
sakal
नागपूर - नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान असताना, एकाच क्रमांकावरून २२ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत निवडणूक आयोगाला वारंवार सांगितल्यावरही त्यावर कारवाई होत नसल्याचे सांगून निवडणूक आयोग भाजपासाठी काम करीत आहे का? असा सवाल कॉंग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.