
नागपूर : गेल्या काही दिवसांत दररोज आढळून येणाऱ्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या तीनपट आहे. त्यामुळे नागरिकांचा आत्मविश्वास आणखी बळकट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यातील २६ हजार नागरिक कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे गेल्या चौदा दिवसांत कोरोनामुक्त झालेल्यांच्या टक्केवारीत दहाने वाढ झाली. दरम्यान, आज नव्याने १ हजार १५१ बाधितांची भर पडली. चोविस तासांत २८ जण कोरोनाचे बळी ठरले असून यात शहरातील ९ तर ग्रामीणमधील ८ जणांचा समावेश आहे. (26 thousand people defeats corona in last six days in nagpur)
कोरोना बाधित तसेच बळींचा आलेख सातत्याने खाली येत आहे. त्याचवेळी कोरोनामुक्त झालेल्यांची टक्केवारी सातत्याने वाढत आहे. आज जिल्ह्यातील ३ हजार ४०५ बाधित कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे आज आढळून आलेल्या बाधितांपेक्षा तीनपट कोरोनामुक्त झाले. यात शहरातील १ हजार ६६ तर ग्रामीण भागातील २ हजार ३९ रुग्ण बरे झाले. ग्रामीण भागात बाधितांची संख्या जास्त असतानाच कोरोनामुक्तांची संख्या अधिक असल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४० हजार बाधित कोरोनामुक्त झाले. यात शहरातील ३ लाख १३ हजार २९३ तर ग्रामीण भागातील १ लाख २६ हजार ७०७ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची टक्केवारी आता ९४ पर्यंत पोहोचली. दोन आठवड्यापूर्वी ही टक्केवारी ८४ टक्के होती. दरम्यान, आज नवे १ हजार १५१ बाधित आढळून आले. यात शहरातील ५६२ तर ग्रामीण भागातील ५७८ जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या ४ लाख ६७ हजार ९३१ पर्यंत पोहोचली. दरम्यान, गेल्या चोविस तासांमध्ये २८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात सर्वाधिक ११ मृत्यू जिल्ह्याबाहेरील असून शहरात ९ तर ग्रामीणमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. एकूण कोरोनाबळींची संख्या ८ हजार ६८५ पर्यंत पोहोचली. यात शहरातील ५ हजार १७१ तर ग्रामीणमधील २ हजार २२० जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील १ हजार २९४ जणांचा शहरात मृत्यू झाला.
दोन आठवड्यांत सक्रिय रुग्णांत ४३ हजाराने घट -
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वेगाने घट होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत असून नागरिकांतही आशादायक चित्र निर्माण झाले आहे. आज जिल्ह्यात १९ हजार २४६ सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे दोन आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या ४३ हजाराने कमी झाली. ७ मे रोजी जिल्ह्यात ६२ हजार २९८ सक्रिय रुग्ण होते.
सहा दिवसांतील कोरोनामुक्तांची संख्या
दिनांक कोरोनामुक्तांची संख्या
१५ मे ४,७८०
१६ मे ४,५१९
१७ मे ३,८९४
१८ मे ४०४३
१९ मे ३,७७८
२० मे ३,४०५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.