
नागपूर : तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्य सेवेतील २७ वनाधिकाऱ्यांना भारतीय वन सेवेत (आयएफएस) पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील भारतीय वन सेवेतील २०२१ पासून पदे रिक्त असताना देखील तांत्रिक, न्यायालयीन प्रकरणे, प्रशासकीय दिरंगाई, सेवाज्येष्ठता यादीतील घोळामुळे २०२१- २२ या वर्षातील निवड सूची करण्यास केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र सरकारला चार वर्ष लागले.