
नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत दहा ते बारा वर्षे सेवा देऊनही वैद्यकीय शिक्षकांची पदोन्नती मिळत नसल्याचे विदारक वास्तव आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालयांतील सुमारे तीन हजारावर सहयोगी अन सहाय्यक प्राध्यापक पदोन्नतीपासून वंचित आहेत. वर्षानुवर्षे पदोन्नती मिळत नसल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे.