
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ३५ हजार ७८८ कोटी ४० लाख ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक ७ हजार ४९० कोटी रुपयांची तरतूद ही सार्वजनिक बांधकाम विभागासाठी करण्यात आली आहे.