३८१ पूरप्रवण गावं, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रीय ठेवण्याचे निर्देश

nagpur
nagpure sakal

नागपूर : पश्चिम महाराष्ट्राच्या पूरपरिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील ३८१ पूर प्रवण (villages in flood dangerous zone) गावात निवारागृहे, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे मार्गाबाबत तपासणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय हेलीपॅड उभारण्यासाठी लागणाऱ्या जागांची पाहणी करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय व २४ तास सतर्क ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. (collector Vimala R.) यांनी आज दिलेत. (381 villages in nagpur are in flood dangerous zone)

nagpur
...तर नागपूरचा होणार कोकण! 'या' आहेत धोकादायक वस्त्या

जिल्ह्यात तोतलाडोह, नवेगाव खैरी, खिंडसी, नांद, वडगाव या मोठ्या पाच प्रकल्पासह मध्यम १२ व लघू ६० सिंचन प्रकल्प आहेत. मध्यप्रदेशातील चौराई धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्यावर तो तोतलाडोह धरणात येतो. त्यासाठी विभागीय व आंतरराज्यीय समन्वय समितीची बैठक झाली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे पशुधन, शेती, व मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. यावर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी संपर्क व समन्वयाने काम करण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत बचावकार्यासाठी लागणारी १० रबर बोटी राज्यशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने व्हॉटसअप ग्रुप करण्यात आला असून संबंधित यंत्रणांचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांचा यात समावेश आहे.

मोठ्या प्रकल्पातील जलसाठा

प्रकल्प टक्केवारी

  • तोतलाडोह ६१

  • नवेगाव खैरी ७०

  • खिंडसी ३२

  • नांद ४३

  • वडगाव ६०

मध्यम प्रकल्प जलसाठा टक्के

  • चंद्रभागा ५८

  • मोरधाम ६१

  • केसरनाला ७४

  • उमरी १००

  • कोलार ९६

  • खेकरानाला ६३

  • वेण ९५

  • कान्होलीबारा ९९

  • पांढराबोडी ६२

  • मकरधोकडा ४

  • सायकी ३५

  • जाम १२

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष

आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. ०७१२-२५६२६६ व टोल फ्री १०७७ या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा. तालुका व गावपातळीवर देखील आपत्ती निवारणासंदर्भात स्थानिक नागरिक, व अशासकीय संस्था व शासकीय अधिकाऱ्यांच्या चमू कार्यरत आहेत.

तोतलाडोहकडे विशेष लक्ष

मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील चौराई धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास ते पाणी तोतलाडोह धरणात येण्यास साधारणतः: २२ ते २४ तास लागतात. तोतलाडोह धरणातून नवेगाव खैरी प्रकल्पात येण्यास तीन ते चार तास तर नवेगाव खैरीतून पेंच व कन्हान येथील बीना संगमला येण्यास पाच ते सहा तासाचा वेळ लागतो. तेथून मौदा शहरामार्गे गोसीखुर्द प्रकल्पात जाण्यास ८ ते १० तासांचा अवधी लागतो. मध्यप्रदेशातील पाऊस व त्यातून गेल्यावर्षी उद्भवलेली पूरपरिस्थिती बघता यावर्षी तोतलाडोह ते गोसीखूर्द पाण्याचा प्रवास लक्षात घेण्याचे जिल्हा प्रशासनाने निर्देशित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com