
नागपूर : जलजीवन मिशनअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांची देयके न मिळाल्यामुळे राज्यातील एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघड झाली. नागपूर जिल्ह्यातही या मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये निधीअभावी अडथळे निर्माण झाले असून, जिल्ह्यात तब्बल ४० कोटींची कंत्राटदारांची बिले थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.