संपामुळे नागपूर जिल्ह्यातील ४० टक्के व्यवसाय बुडाला | St Strike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST bus
संपामुळे नागपूर जिल्ह्यातील ४० टक्के व्यवसाय बुडाला

संपामुळे नागपूर जिल्ह्यातील ४० टक्के व्यवसाय बुडाला

नागपूर - लॉकडाउननंतर एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील कोट्यवधीचा व्यापार प्रभावित झाला आहे. ग्रामीण भागात वस्तू पाठवणेही अवघड झाल्याने काही गावांमध्ये वस्तूंची टंचाई जाणवू लागल्याची माहिती पुढे आली आहे.

एसटी वाहतूक बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी येणे थांबले आहे. काही व्यापाऱ्यांनी त्यावर तोडगा काढत व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून वस्तूंची विक्री करीत आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा आणि विजेच्या पुरवठ्याच्या अडचणी आहेत. त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील दुकानांमध्ये मालाची टंचाई जाणवू लागलेली आहे. दिवाळीनंतर लग्नसराईसाठी बाजारात होणारी गर्दीच गायब झाली आहे. परिणामी, अनेकांच्या हातचा रोजगारही गेला आहे.

‘गेल्या पंधरा दिवसापासून एसटी बंद असल्याने शहरातील व्यापार प्रभावित झाला आहे. ३० ते ४० टक्के व्यवसाय कमी झालेला आहे. लग्न सोहळ्याच्या तोंडावर एसटीच्या संपाने व्यापाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.’

- बी. सी. भरतीया, अध्यक्ष, अखिल भारतीय व्यापारी महासंघ

loading image
go to top