
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूरला येत आहेत. याच दिवशी गुढीपाडवा असल्याने त्यांचे आगळेवेगळे स्वागत करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. याकरिता विमानतळ ते रेशीमाबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयादरम्यान तब्बल ४२ चौकांमध्ये गुढी उभारून मोदी यांचे स्वागत केले जाणार आहे. या स्वागत समारंभात नागरिकही मोठ्या संख्येत सहभागी होणार आहेत.