esakal | अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पाच आरोपी अटकेत; नागपूर जिल्ह्यातील घटना 
sakal

बोलून बातमी शोधा

5 men misbehaved with a girl in Nagpur district

दोन जानेवारीला पीडित मुलीने रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार केली. फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे आरोपी अतुल विश्‍वनाथ हटवार (रा.अंधळगाव, ता.मोहाळी, जि. भंडारा) याने जबरदस्तीने मुलीला दुचाकीवर बसवून खिंडसी तलाव परिसरातील डोंगराजवळील घनदाट झाडीत घेऊन गेला.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पाच आरोपी अटकेत; नागपूर जिल्ह्यातील घटना 

sakal_logo
By
राहुल पिपरोदे

रामटेक (जि. नागपूर) :  रामटेक पोलिस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर एका तेरा वर्षीय मुलीवर गावातीलच पाच युवकांनी अत्याचार केल्याची घटना घडली. २९ डिसेंबरला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

दोन जानेवारीला पीडित मुलीने रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार केली. फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे आरोपी अतुल विश्‍वनाथ हटवार (रा.अंधळगाव, ता.मोहाळी, जि. भंडारा) याने जबरदस्तीने मुलीला दुचाकीवर बसवून खिंडसी तलाव परिसरातील डोंगराजवळील घनदाट झाडीत घेऊन गेला. तिथे पोहोचल्यानंतर त्याने त्याचे मित्र धीरज मेहरकुळे, सौरभ मेहरकुळे, होमदास मेहरकुळे, हर्षल मेहरकुळे (सर्व रा.दुधाला, कवडक) यांना फोनवरून बोलावून घेतले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक सबंध प्रस्थापित केले.

 घटना घडल्यानंतर अल्पवयीन मुलीने रडत रडत आईवडिलांना हकीकत सांगितली. आईवडीलांनी पोलिस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार केली. माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नयन आलूरकर, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेशवर, कर्मचारी वर्ग यांनी शिताफीने गुन्ह्यातील पाचही आरोपीला तात्काळ अटक केली. 

क्लिक करा - बाप रे! प्रचंड डोकेदुखी असल्यानं डॉक्टरकडे गेली महिला; शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूतून निघाला टेनिसबॉलच्या आकाराचा गोळा

आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा व अनुसूचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ जानेवारीच्या सकाळपर्यंत पोलिस तपास करीत होते. या दरम्यान २ जानेवारीला ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीही भेट दिल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद मकेशवर यांनी सांगितले. या गुन्ह्याच्या तपास रामटेक पोलिस उपविभागीय अधिकरी नयन आलूरकर करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image