50 वर्षीय नराधमाचे संतापजनक कृत्य, चिमुकलीने चाईल्डलाईनकडे सांगितली ही आपबिती...

A 50-year-old man raped a little girl
A 50-year-old man raped a little girl
Updated on

नागपूर : गेल्या सहा महिन्यांपूर्वीच कपिलनगरात रहायला आलेला आरोपी रवी ऊर्फ पंडितजी (वय 50) याची वागणूक सुरुवातीपासून संशयास्पद होती. महिला मुलींकडे त्याचे पाहणे अनेकांना खटकायचे, परंतु एखाद्यावर आरोप करायचे तरी कसे, या विचाराने कुणी काही बोलत नव्हते. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने संपूर्ण कपिलनगर हादरले. रवीची शेजारी राहणाऱ्या पाचव्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर वाईट नजर होती. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तो तिच्याशी बोलायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी उर्फ पंडितजी हा गेल्या सहा महिन्यांपूर्वीच कपिलनगरात राहायला आला होता. सुरुवातीपासूनच त्याची वागणूक संशयास्पद होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवले नव्हते. त्याच्या घराच्या काही अंतरावर पीडित दहा वर्षीय मुलगी सोनाक्षी (बदललेले नाव) हिचे कुटुंब राहते. सोनाक्षीचे वडील एमआयडीसीतील एका कंपनीत मजूर आहेत तर आई वस्तीत धुणीभांडी करते.

तिला 12 वर्षांचा मोठा भाऊ आहे. दाम्पत्य रोज कामावर गेल्यानंतर पंडितजी सोनाक्षीच्या घरासमोर येत होता. सोनाक्षी आणि तिच्या भावाला चिप्सचे पाकीट, चॉकलेट द्यायचा. शेजारी असल्याने तसेच लहान मुलांना खाऊ देत असल्याने कुणी फारसे लक्ष दिले नाही. मात्र, विकृत स्वभावाच्या पंडितजीची नजर सोनाक्षीवर होती. सोनाक्षी शाळेतून घरी आल्यानंतर तिला जवळ बोलावणे, तिच्या अंगाला स्पर्श करणे किंवा तिच्याशी तो लगट करायचा. मात्र, नियमित चॉकलेट मिळत असल्याने लहानग्या सोनाक्षीने त्याबाबत आई-वडिलांकडे तक्रार केली नाही.

तीन महिन्यांपूर्वी संधी मिळताच पंडितजीने शाळेतून आलेल्या सोनाक्षीला खूप चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेले. तिला चॉकलेट दिल्यानंतर अश्‍लील चाळे केले. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास भाऊ आणि आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या सोनाक्षीने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही.

पंडितजीबाबत वस्तीत चर्चा

पंडितजी केवळ सोनाक्षीला चॉकलेट देत असल्याने अनेकांना संशय यायचा. वस्तीत एवढे लहान मुले असून, हा दररोज केवळ सोनाक्षीलाच का चॉकलेट देतो, असेही काही जण बोलून जायचे. याशिवाय तो वाट्टेल तेव्हा सोनाक्षीला स्वतःच्या घरी घेऊन जात होता. तिचे लैंगिक शोषण केल्यानंतर धमकी देत होता. गेल्या महिन्याभरापासून पंडितजीच्या कृत्याची वस्तीभर चर्चा होती. मात्र, कुणीही खुलून बोलायला तयार नव्हते.

'तुम्हारे पास क्‍या सबूत है'

वस्तीतील तीन ते चार युवकांनी पंडितजीच्या कृत्याला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कपिलनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदाराची भेट घेतली. घडत असलेला प्रकार सांगितला. मात्र, ठाणेदाराने "तुम्हारे पास क्‍या सबूत हैं' असा प्रतिप्रश्‍न करून युवकांना आल्यापावली परत पाठवले. तसेच साधी चौकशी करण्याचेही सौजन्य दाखविले नाही, असा आरोप होत आहे.

चाइल्ड हेल्पलाईन मदतीला

मध्यप्रदेशातून कामाच्या शोधात आलेल्या मजूर दाम्पत्याच्या पाठीशी कुणीही नसल्याने सोनाक्षीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत त्यांनी चुप्पी साधली होती. मात्र, इंडियन सेंट्रल फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट चाइल्ड लाईन सहयोगी संस्थेच्या समन्वय छाया राऊत गुरव, सदस्या अंकिता गडपायले यांना माहिती मिळाली. त्यांनी बालसंरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण यांच्याशी चर्चा करून स्वःत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. अंकिता आणि छाया यांनी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून सामाजिक कार्यकर्ते निखिलेश मेश्राम यांच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आणला.

अंगावर काटा आणणारे कृत्य

50 वर्षीय रवी ऊर्फ पंडितजी तुमडाम विकृत मनोवृत्तीचा होता. तो डोळ्यातून अश्रू येईपर्यंत अनैसर्गिक अत्याचार करीत होता. रडल्यास तोंडात रूमाल कोंबत होता. नखाने ओरबडणे आणि दाताने चावणे असा विकृतपणा करीत होता, अशी आपबीती दहा वर्षीय सोनाक्षीने चाईल्ड लाईनला सांगितली. सोनाक्षीने आपबीती सांगितल्याने ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहत होता, अशी माहिती छाया गुरव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com