esakal | कोरोनाने पुसले ५९९ महिलांचे कुंकु, ४६ बालकांनी गमावले दोन्ही पालक
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

कोरोनाने पुसले ५९९ महिलांचे कुंकु, ४६ बालकांनी गमावले दोन्ही पालक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाने (coronavirus) अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. कुटुंबाचा आधार हिरावून घेतला. नागपूर जिल्ह्यात ५९९ महिलांचे पती, ४६ बालकांचे आई आणि वडील मृत पावले आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे दोन्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या बालकांच्या मदतीसाठी सामाजिक तपासणीचा अहवाल कालमर्यादेत तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या आहेत. त्यातून हे वास्तव पुढे येऊ लागले आहे. (599 women lost their husband due corona in nagpur)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना हटवार, परीविक्षा अधिकारी धनंजय उभाळ, डॉ. दीपिका साकीरे, महापालिकेचे समाजकल्याण अधिकारी दिनकर उमरेडकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक प्रकाश कांचनवार, चंदा खैरकर आदी यावेळी उपस्थित होते.

बालकांची सामाजिक तपासणी करताना मनुष्यबळाची कमतरता पडणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष द्या. विभागातर्फे दोन्ही पालक मृत्यू झालेल्या बालकास ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य तत्काळ देता येईल. तसेच एक पालक गमावलेल्या बालकास शासनाच्या योजनेचा लाभ देता येईल, असे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने तपासणीच्या कामात तालुकास्तरावर सहकार्य करावे, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या अनाथ प्रमाणपत्रासाठी तहसीलदार व पोलिस यंत्रणांची मदत घ्यावी. तसेच कोरोना संसर्गामुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शाळेच्या शुल्काबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. यासाठी बालकांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करणे फार महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.

४६ बालकांचे दोन्ही पालक गेले. यातील १९ बालक अनुरक्षण तर तीन बालकांना आशा किरण बालगृहात ठेवण्यात आले. एक बालक नातेवाइकांना देण्यात आले.

  • १ बालक गमावल्याचे १ हजार ३७० अर्ज

  • ३८१ बालकांचा सामाजिक तपासणी अहवाल तयार

  • ५९९ महिला विधवा

  • विधी सेवा प्राधिकरणाद्वारे ३६ बालकांना मदत

loading image