esakal | पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी आपल्याच देशात नैसर्गिकरीत्या इंधन तयार करण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाची संकल्पना पुढे आणली होती. त्यातूनच प्रेरणा घेत अचलपूर तालुक्यातील वाघडोह येथे एक प्रकल्प उभारण्यात येत आहे. तो अमरावती जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. यासाठी हिमांशू शर्मा आणि तुषार नांदूरकर या दोन भूमिपुत्रांनी पुढाकार घेतला आहे. (petrol-and-diesel-Biofuels-from-grass-Amravati-news-People-Connect-news-nad86)

देशात दररोज पेट्रोल-डिझेल आणि गॅस यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही हे पदार्थ हानिकारक आहेत. त्यामुळे जैविक तंत्रज्ञानाचा पर्याय पुढे आला आहे. अचलपूर तालुक्यातील वाघडोह येथे दहा एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असून तालुक्यातील प्रत्येक गावात गवताची लागवड केली जाणार आहे. या व्यतिरिक्त गाव व शहरातील ओला कचरा, पाला पाचोळ या जैवइंधन निर्मिती वापरण्यात येणार आहे.

हेही वाचा: बोंबला! निकालाचे संकेतस्थळच ‘क्रॅश’; विद्यार्थ्यांची धावपळ

मुंबईच्या मिरा क्लिनफ्युल या नामवंत कंपनीच्या तांत्रिक आणि आर्थिक मदतीच्या साहाय्याने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील करार ही त्यांच्यात झाला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडल्यानंतर प्रकल्प उभारणीच्या कामाला वेगाने सुरुवात होणार आहे. येत्या वर्षभरात हा जैवइंधनाचा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती हिमांशू शर्मा यांनी दिली.

शेतकऱ्यांना येणार सुगीचे दिवस

या प्रकल्पात शेती असणारे व भूमिहीन दोन्हीही शेतकरी सभासद होऊ शकतात. त्यानंतर शेतकऱ्यांना नेपियर या गवताची लागवड करायला प्रोत्साहित केले जाईल. नंतर त्या गवताची खरेदी कंपनीच्या माध्यमातून एक हजार रुपये दराने केली जाईल. या गवतातून शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन लाखांचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या गवताचे उत्पादन शेतकरी जिथे जागा मिळेल त्याठिकाणी, पडीक, डोंगराळ जमीन, नदी नाल्याच्या परिसरात, शेतीत घेता येणार आहे. सोबत बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पात बाराशे ते पंधराशे लोकांना रोजगार निर्माण होणार आहे.

(petrol-and-diesel-Biofuels-from-grass-Amravati-news-People-Connect-news-nad86)

loading image