नियम मोडणाऱ्यांकडून नागपूर पालिकेच्या तिजोरीत सहा कोटी जमा

गांधीबाग, धंतोली, धरमपेठ झोन आघाडीवर
6 crore deposited in the coffers of Nagpur Municipal Corporation
6 crore deposited in the coffers of Nagpur Municipal Corporation

नागपूर : उपद्रव शोध पथकाद्वारे नागरिकांवर आकारण्यात येणाऱ्या दंडातून महानगरपालिकेच्या तिजोरीत १ एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ वर्षभरात ३९,१२८ प्रकरणांमधये एकूण ६ कोटी ४३ लाख ३७ हजार ३७५ रुपये जमा झाले आहे. नियम मोडण्याऱ्यांमध्ये गांधीबाग झोन आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. यावरुन नागरिकच महापालिकेची तिजोरी भरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

नियमांचे उल्लघंन, अस्वच्छता निर्माण करणे, वैयक्तिक कामासाठी रस्ता रोखणे, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणे, विना परवानगी होर्डिंग लावणे. आदीसाठी नागरिकावर दंड आकारण्यात येतो. शहरातील दहा झोन अंतर्गत नागरी वस्त्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वात जास्त दंडाची रक्कम गांधीबाग झोन अंतर्गत मिळाल्याचे उपद्रव शोध पथकाद्वारे मिळालेल्या माहितीवरून समोर आले.

रस्त्यावर बांधकाम साहित्य विनापरवानगी टाकल्याप्रकरणी संपूर्ण शहरातील कारवाईतून १ कोटी ३३ लाख ७६००० रुपये नागरिक व बिल्डरांकडून तसेच १२ लाख ५० हजारांचा दंड नागरिकांकडून वसूल करण्यात आला. विविध आस्थापने संस्था, व्यक्तिमार्फत केल्या जाणाऱ्या अस्वच्छतेसाठी दहा झोन अंतर्गत कारवाईतून १७ लाख ७३ हजार ७०० रूपये दंड वसूली करण्यात आली. फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते, हाथगाड्या चालक यांच्य़ाकडून मोठ्या प्रमाणावर अस्वच्छ केली जाते. असे माहती वरुन दिसून आले. वाहतुकीचा रस्ता मंडप, मंच उभारुन वैयक्तिक कामाकरिता बंद केल्याप्रकरणी २१ हजार ६९६ केस मध्ये ३ कोटी ८४ लाख ४७ हजार ४७५ रुपये दंड आकारण्यात आला.

झोन अंतर्गत केलेली कारवाई

  • झोन - प्रकरणे - दंडाची रक्कम

  • लक्ष्मीनगर - ५५८७ - ५९ लाख ४८ हजार

  • धरमपेठ - ३२६४ - ७५ लाख ४५ हजार

  • हनुमान - ३८०७ - ५६ लाख ४ हजार

  • धंतोली - ३४८५ - ७४ लाख ४८ हजार

  • नेहरू नगर - ३३०८ - ५० लाख २७ हजार

  • गांधीबाग - ४३७५ - ८६ लाख ४० हजार

  • सतरंजीपुरा - २७३३ - ५६ लाख ३३ हजार

  • लकडगंज - ३३२२ - ५४लाख ३६ हजार

  • आशीनगर - ३९७१ - ६९ लाख ४८ हजार

  • मंगळवारी - ५२७६ - ६१ लाख ६ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com